दुष्काळ – पाण्याचा की विचारांचा?
(थोर पर्यावरणतज्ज्ञ अनुपम मिश्र ह्यांचा हा लेख काश्मीरमधील प्रलयाच्या पार्श्वभूमीवर ह्या अंकात प्रकाशित करीत आहोत. डॉ राजेन्द्रप्रसाद ह्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे हे विचार प्रथम आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आले होते. प्रस्तुत लेखात, समुद्रकिनाऱ्यावरील खारफुटीची जंगले नष्ट केल्यामुळे त्या प्रदेशात किंवा मुद्दाम उंचावरून रस्ते काढल्यामुळे सखल प्रदेशात पूर आल्याची उदाहरणे देऊन त्यांनी एक महत्त्वाचा सिध्दान्त मांडला आहे, …